ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारीत कार्यकारणीची शुक्रवारी ओरोस येथे सभा
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारीत कार्यकारणीची सभा शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन, ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेस सर्व प्रमुख नेते मंडळी, माजी आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, महिला तालुकाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.