कॅबिनेटमंत्री ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांचा पावशी – कुडाळमध्ये उद्या भव्य सत्कार सोहळा
शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे युवा नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. नितेश राणे यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर रविवारी २२ डिसेंबर रोजी त्यांचे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होत आहे. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघांच्या वतीने सायंकाळी ५ वा. शांतादुर्गा हॉल पावशी ता. कुडाळ येथे महायुतीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा देखील भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याला शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.
ना. नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांच्या सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी दत्ता सामंत यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले. या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, माजी सभापती सुनिल घाडीगावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, प्रीतम गावडे, संतोष साटविलकर, अवधूत हळदणकर, राजन माणगावकर, दयानंद प्रभुदेसाई, दीपा सावंत, सुशांत घाडीगांवकर, कमलेश प्रभू, मंदार लुडबे, विनायक बाईत, प्रशांत परब, निलेश बाईत, शेखर पेणकर, भाऊ मोर्जे, बाळा वेंगुर्लेकर, मंगेश यादव, जगदीश घाडी, भगवान लाड, प्रकाश किर्लोस्कर, महेश बागवे, सागर घाडी, भाई सावंत, विनोद भावे, बबन परब, छोटू ठाकुर, दादा नाईक, बाबू चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जगदीश घाडी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.