राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर : नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदर विकास खाते

मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बरेच दिवस रखडलेलं राज्य सरकारचं खातेवाटप शनिवारी उशिरा जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण आणि नगरविकास खातं मिळालं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. 

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील रविवारी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र मागील आठवडाभर खातेवाटप रखडलं होतं. आज नागपूर मधील हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर काही वेळापूर्वी खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ना. नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास वाटप देण्यात आले असून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे.

सविस्तर खातेवाटप खालील प्रमाणे….

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

  1. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  2. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  3. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  4. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  5. योगेश कदम – गृहराज्य शहर
  6. पंकज भोयर – गृहनिर्माण,
    [
    फडणवीस : गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय
    शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण
    पवार: अर्थ
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!