भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा अक्कलकोट येथे वाढदिवस साजरा
वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोक सावंत यांचा ६१ वा वाढदिवस सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र अक्कलकोट येथे नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने श्री. सावंत यांनी कुटुंब आणि मित्रपरिवारासह श्री क्षेत्र आदमापूर, नृसिंहवाडी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे श्रींचे दर्शन घेतले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत हे दरवर्षी आपला वाढदिवस आपले कुटुंब आणि कौटुंबिक मित्रपरिवाराच्या सोबतीने अक्कलकोट आणि परिसरातील मंदिरांचे दर्शन घेऊन साजरा करतात. यावर्षी ९ डिसेंबर रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रविवारी श्री क्षेत्र आदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. तर यानंतर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शन घेण्यात आले. तर सोमवारी ९ डिसेंबरला पहाटे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर याठिकाणी स्वामींच्या सानिध्यात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. दुपारी गाणगापूर येथे जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सौ. सावंत, त्यांचे बंधू संतोष सावंत, सौ. सावंत, उद्योजक सत्यवान चव्हाण, सौ. चव्हाण, हॉटेल व्यावसायिक तथा छायाचित्रकार समीर म्हाडगुत, पत्रकार कुणाल मांजरेकर, कृष्णा ढोलम, प्रशांत हिंदळेकर, समीर वजराटकर, रवी टेंबुलकर, महेश वाईरकर आदी उपस्थित होते.