देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी ; मालवणात भाजपाचा जल्लोष
मालवण : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. मालवण येथे भाजपा कार्यालयातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच लाडू वाटून भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, पंकज सादये, विलास मुणगेकर, संतोष गांवकर, माधुरी मसुरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, विजय निकम, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, विकी तोरसकर, शर्वरी पाटकर, पुजा वेरलकर, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, प्रिती सावंत, प्रतिभा प्रभाळे, मिठबावकर, शेखर फोंडेकर, किशोर खानोलकर, दीपक सुर्वे, नंदू देसाई, विरेश पवार, सुनील बागवे, भोगावकर, केळुसकर, महेश सारंग, भाई मांजरेकर, शुभम लुडबे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.