आस्था ग्रुप आयोजित शालेय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ७०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग


वेदांत पोफळे, महिमा मोहीते, तनिष मुळीक, दिग्विजा सातपुते गटानुक्रमे प्रथम
मालवण : येथील आस्था ग्रुप आणि कै. अरूण काशिनाथ बादेकर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत सुमारे ७०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चार गटात झालेल्या या स्पर्धेत वेदांत पोफळे, महिमा मोहीते, तनिष मुळीक, दिग्विजा सातपुते गटानुक्रमे प्रथम क्रमांक मिळवला.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते कोळंब सागरी महामार्ग या ठिकाणी झाले. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मुलगे व मुली अशा चार गटात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समस्त मालवणकर पोलीस प्रशासन शिक्षक वर्ग आणि आस्था ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

यावेळी ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, बादेकर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, राजन बादेकर, निनाद बादेकर, हरी चव्हाण, विद्याधर केनवडेकर, चौके उपसरपंच पांडूरंग चौकेकर, सूर्यकांत फणसेकर, सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, आगोस्तीन डिसोजा, प्रशांत हिंदळेकर, प्रसाद बांदेकर, संग्राम कासले, सिद्धेश मांजरेकर, कुणाल मांजरेकर, अजय शिंदे, श्रीनाथ फणसेकर, सौ. सारिका शिंदे, कोळंब पोलीस पाटील संग्राम कासले, ललित चव्हाण, ओंकार यादव, उमेश शिरोडकर, रवी मिटकर, अमित खोत, पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, पप्पू गावकर, सचिन पेडणेकर, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.


मॅरेथॉन स्पर्धा निकाल – पाचवी ते सातवी गट मुलगे प्रथम वेदांत विनायक पोफळे (कट्टा), द्वितीय पृथ्वीराज शंकर राठोड (आचरा हायस्कूल), तृतीय प्रणव रामकृष्ण गवंडी (जय गणेश इंग्लीश मिडीयम स्कूल). मुली प्रथम महिमा विशाल मोहिते (कुडाळकर हायस्कूल), द्वितीय तन्वी खंडू शिंदे (चौक हायस्कूल) तृतीय हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर (देऊळवाडा प – ाथमिक शाळा). गट दुसरा आठवी ते दहावी मुलगे प्रथम तनिष महेश मुळीक (मसूरे हायस्कूल), द्वितीय आशीर्वाद प्रमोद सातपुते (आचरा हायस्कूल), तृतीय दीप समीर प्रभू (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल). मुली गट प्रथम दिग्विजा संदीप सातपुते (आचरा हायस्कूल), द्वितीय अनुष्का खंडू शिंदे (चौके हायस्कूल), तृतीय किमया प्रशांत चव्हाण (चौके हायस्कूल).

या स्पर्धेत आचरा, कट्टा, मसुरे, मालवण, चौके, वायरी येथील स्पर्धक सहभागी झाले होते. शनिवारी शाळा असतानाही स्पर्धकांनी घेतलेला सहभाग कौतुकास्पद होता. यावेळी पोलीस निरीक्षक प्रविण काल्हे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिडा शिक्षक अजय शिंदे यांनी अशाप्रकारे दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत लागते. आस्था ग्रुपच्यावतीने दरवर्षी मुलांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा आयोजित केली जात असल्याने मुलांच्याही क्रिडा कौशल्याला यामुळे चांगली संधी मिळत आहे. या स्पर्धेत एकही स्पर्धक जखमी न होता, स्पर्धा यशस्वी होणे कौतुकास्पद आहे, असे सांगितले. स्पर्धेचे सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले.

