आरोग्य उपसंचालकांकडून मालवण, पेंडूर ग्रामीण रुग्णालयांना भेटी ; आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

मालवण : केंद्रीय कॉमन रेव्ह्यू मिशन पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याची पूर्वतयारी व आढावा घेण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी नुकतीच मालवण आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन आढावा घेतला. या दोन्ही ग्रामीण रुग्णालयात सुमारे ५०० च्या वर डायलिसिस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, असंसर्गिक कार्यक्रम व कुटुंब कल्याण कार्यक्रम, लसीकरण कार्यक्रम, औषध पुरवठा, रिक्त मनुष्यबळ, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आभा कार्ड, क्षयरोग व लेप्रसी तसेच हत्तीरोग, मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांबाबत त्यांनी आढावा घेतला. औषध साठा सुसज्ज ठेवणे ,प्रसुती सेवा वाढविणे, रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनांना सूचना दिल्या. ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे संभाव्य क्रिटिकल केअर युनिटच्या जागेबाबत पाहणी केली. मालवण ग्रामीण रुग्णालय श्रेणी वाढवून ५० खाटांचे  उपजिल्हा रुग्णालय करण्यासंदर्भात येत असलेल्या जागा व इतर अडचणी संदर्भात इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे अडचणी सोडवणे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करणे व पेंडुर कट्टा येथे प्रस्तावित डायलिसिस युनिट, NUHM अंतर्गत नागरी आशा, अर्बन हेल्थ सेंटर इत्यादी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, निवासी वैदयकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ग्रामीण रुग्णालये प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ स्वप्निल बोधमवड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ अतुल गंडाले, डॉ मोंडकर, डॉ आदिल, डॉ विजय वेरुलकर, डॉ मेहेंदळे डॉ. गावकर, डॉ. वैभव गावकर, डॉ. कदम, डोके अधीपरीचारिका सौ. संतोषी देसाई, सौ. सावंत, सौ कुबल, सौ कदम, सौ रणदिवे हेमांगी, आरोग्य सहाय्यक कोरडे, विनायक सावंत, वरिष्ठ सहाय्यक सौ मीनल वस्त, श्रीमती तळावडेकर, क्ष किरण तंत्रज्ञ केळुस्कर, सौ कोरडे, फार्मा ऑफिसर रघुवीर नकाशे, जोउजल, लॅब टेक्निशियन सुनील खूपसे, जिल्हा समन्वयक राजेश पारधी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. संभाव्य निवडणूक कार्यक्रम, केंद्रीय कॉमन रिव्ह्यू मिशन जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर कर्मचारी यांनी कर्तव्यावर राहणे बाबत त्यांनी सूचना दिल्या

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!