आदित्य ठाकरे उद्या मालवणात ; निषेध मोर्चात सहभागी होणार

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने उद्या काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले असून या घटनेचा निषेध म्हणून उद्या सकाळी दहा वाजता महाविकास आघाडी व शिवप्रेमींच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सहभागी होणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!