Malvan | रहिवाशी संघ साईनगरच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप ; ४० वर्षांचे सातत्य…
परिसरातील बालवाडी ते पदवीच्या १२५ विद्यार्थ्यांना वाटप ; स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील रहिवाशी संघांच्या वतीने स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी धुरीवाडा परिसरातील बालवाडी ते पदवीच्या १२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. १९८५ साली साईनगर मध्ये बालवाडी स्थापनेपासून ते साईमंदिर उभारणी झाल्यापासून ४० वर्षे अखंडितपणे हा उपक्रम सुरु आहे.
साई मंदिरात दरवर्षी दत्त जयंती, दसरा, रामनवमी, गुरुपौर्णिमा या उत्सवा सोबत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजी झेंडावंदन कार्यक्रम देखील उत्साहात साजरे केले जातात. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब अध्यक्ष महेश अंधारी तसेच साईमंदिर उपाध्यक्ष महेश सारंग, सचिव राजू बिडये, दिलीप हडकर, विलास परुळेकर, विशाल परुळेकर, अतुल परुळेकर, आनंद तळाशिलकर, बाळू परुळेकर, सुभाष परब, दशरथ साळगावकर, बाबू शिंदे, आनंद हडकर तसेच जयमाला मयेकर, ललित चव्हाण, पल्लवी तारी, विवेक पाटील आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
आपल्या प्रस्ताविकात रहिवाशी संघाचे सरचिटणीस राजू बिडये यांनी या कार्यक्रमानिमित्ताने संस्था स्थापनेपासून ज्यांचे सहाय्य लाभत आले ते खरेदी विक्री संघ माजी अध्यक्ष उदयराव मोरे, लायन्स क्लब अध्यक्ष बाळू अंधारी, ज्येष्ठ पत्रकार किशोर महाजन, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, भाऊ सापळे या सर्वांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महेश परब, गणेश परब, गणेश साळसकर, आनंद हडकर, दिगंबर तळाशिलकर, आशिष परुळेकर , बाबू शिंदे, प्रतिक परब, विक्रांत बिर्जे, साई तळाशिलकर, प्रसाद राऊत, सचिन हडकर, राजा मांजरेकर, शुभम लुडबे, बंटी हडकर, पंकज गावडे आदी उपस्थित होते.