घाटमाथ्यावर जसा सहकार रुजला तसा कोकणात रुजवूया

आचरा येथील सहकार मेळाव्यात मान्यवरांचे उदगार ; खरेदी विक्री संघाचे आयोजन

मालवण : सहकार हा केवळ संस्था काढणे, निवडणुकीला उभं राहणे एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता सहकारात नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. त्यांना मजबूत करता आले पाहिजे. सहकारी संस्था कागदावर न राहता तळागाळातील प्रत्येकाची सहकारातुन समृद्धी झाली पाहिजे. घाटमाथ्यावर जसा सहकार रुजला तसा कोकणात रुजवूया असा निर्धार मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सहकार मेळाव्यात मान्यवारांनी केला. 

बदलते सहकारी धोरण, सहकारातील संधी हा उद्देश ठेऊन मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा आचरा येथील निलेश सरजोशी यांच्या सभागृहात सहकार मेळावा पार पडला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उद्योग व्यवस्थापन तज्ञ नंदकिशोर परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, सरोज परब, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, विलास हडकर, बाळू कुबल, एनजिओ फेडरेशन जिल्हाध्यक्ष बबलू राऊत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, विजय ढोलम, महेश गावकर, आबा हडकर, अमित गावडे, प्रफुल्ल प्रभू, के पी चव्हाण, सुरेश चौकेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, संतोष कोदे, यासह मोठ्या संख्येने विकास सोसायटी चेअरमन, सचिव, संचालक आणि सभासद उपस्थित होते. 

यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, कोकणात सहकार रुजला नाही वस्तुस्थिती आहे. त्यावर चर्चा न करता गावागावातील शेतकरी सोसायटी आज अडचणीत आहेत त्यांना बँकांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. शेतकरी सोसायटी बळकट करणे गरजेचे आहे. त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे असून संपूर्ण तळागाळात सहकराची पाळेमुळे मजबूत केली तर कोकणात सहकार रुजायला वेळ लागणार नसल्याचे चिंदरकर म्हणाले. 

जिल्हा बँक संचालक बाबा परब म्हणाले, मालवण तालुका खरेदी विक्री संघाने आयोजित केलेला सहकार मेळावा हा जिल्ह्यातील पहिलाच आहे. असे मेळावे होणे गरजेचे आहे. आपली सुद्धा अनेक सहकारी संस्थां मधून सहकरात एंट्री झाली. त्यानंतर आज जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आलो. मालवण तालुका खरेदी विक्री संघाने अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा माफक दरात खते, बी बियाणे, औजारे उपलब्ध केली. मालवण खरेदी विक्री संघ जिल्ह्यात मोठा असल्याचे बाबा परब यांनी सांगितले. 

पर्यटन सहकारी संस्था स्थापन करणे काळाची गरज

उद्योग व्यवस्थापन तज्ञ नंदकिशोर परब यांनी उपस्थिताना व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन केले. सहकाराची ताकद फार मोठी आहे. उत्तर महाराष्ट्रात ती पहायला मिळत आहे. कोकणात सहकार रुजला नाही त्याला अनेक कारणे आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मालवण खरेदी विक्री संघाचे अनेक व्यवसाय आहेत. हॉटेल व्यवसायात सुद्धा पदार्पण करत आहेत. मालवण हा पर्यटन तालुका आहे. लाखो पर्यटक मालवणला भेट देतात. पर्यटनातून अनेक रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी पर्यटन संस्था स्थापन होणे काळाची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात एवढी शेती आहे, पण  शेतकऱ्यांना आज खतासाठी इतर जिल्ह्यातील शेती संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे हे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मांजरेकर तर आभार सुरेश चौकेकर यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!