मनसे दणका… आनंदव्हाळ येथील “त्या” रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

मनसे शिस्टमंडळाने व्यक्त केली होती नाराजी ; दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल मनसेने कार्यकारी अभियंता सर्वगौड यांचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करण्यात आलेल्या आनंदव्हाळ येथील रस्त्याच्या कामाबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सा. बां. विभागाचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वागौड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 

मोदींच्या मालवण दौऱ्यावेळी मालवणात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. तसेच या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. यातील बहुतांश रस्ते काम झाल्यानंतर दोन दिवसातच निखळून पडले होते. यातील आनंदवाळ येथील तीव्र उतारावरील रस्त्याचा समावेश होता. १५ डिसेंबरला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांच्याकडे या रस्त्यांच्या निकृष्ट कामाची तक्रार मनसे शिष्टमंडळाने केली होती. यावेळी कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी सदर खराब झालेला रस्ता लवकरच दुरुस्त करण्यात येईल व त्याला जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार आजपासून हे काम सुरू होणार अशी कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मनसे पदाधिकार्‍यांना दिल्याने मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदीप लाड, कुणाल माळवदे, कुणाल चोडणकर यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच दर्जेदार रस्ता बनवण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याने कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड व त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनसेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!