युवासेनेच्या वतीने मालवणात तालुकास्तरीय “गौराई माझी लाडाची गं” स्पर्धा

मालवण : युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘गौराई माझी लाडाची गं’ या तालुकास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३ रुपये व सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा एक सेल्फी व एक व्हिडिओ २३ सप्टेंबर पर्यंत मोबाईल क्रमांक ९४२१९७११५९ या क्रमांकावर पूर्ण नाव, पत्ता यासह पाठवायचा आहे. २५ सप्टेंबरला स्पर्धेतील विजेता जाहीर केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ८६९८६०८३७४, ९३२५९४२७९८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!