Malvan : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
संशयिताच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई व अमृता मोंडकर यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
विवाहीत महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातून संशयित आरोपी महेश लक्ष्मण मसुरकर (वय ३३, रा. सुकळवाड ता. मालवण) याची मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. देवकाते यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अमृता मोंडकर यांनी काम पाहिले.
सविस्तर वृत्त असे की, १८ डिसेंबर २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीच्या राहत्या इमारतीच्या परिसरात अश्लील बोलून व स्पर्श करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार २१ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादी महिलेने मालवण पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यानुसार मालवण पोलीस स्थानकात आरोपीविरुद्ध भा. द. वि कलम ३५४, ३५४ अ(१), ३५४ अ(२), ३५४ अ(२)(४)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती मालवण पोलिसांनी मे. मालवण न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसचे कामी सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती फिर्यादीस झालेला विलंब, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.