आस्था ग्रुपतर्फे मालवणात १३ ऑगस्टला देशभक्तीपर समुह गीतगायन स्पर्धा
मालवण : येथील आस्था ग्रुपच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे.
ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी आणि महाविद्यालयीन अशा गटात स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना पहिल्या गटासाठी ५०१ व ३०१ रूपये, दुसऱ्या गटासाठी २००१ व १००१ रूपये, तिसऱ्या गटासाठी ३००१ व २००१ रूपये तसेच सर्व गटांसाठी आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघात वाद्यवृंदांसह तर कमीत कमी ७ तर जास्तीत जास्त १५ स्पर्धक विद्यार्थी असावेत. सादरीकरणासाठी दहा मिनीटे कालावधी आहे. सहभागी संघांनी वाद्यवृंदांची व्यवस्था स्वतः करावी. सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे सौगंधराज बांदेकर (९४२००२२८९०) यांच्याकडे द्यावीत. या स्पर्धेत तालुक्यातील आणि शहरातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव मनोज चव्हाण यांनी केले आहे.