कुंभारमाठ गावचे सुपुत्र उत्तम फोंडेकर यांचा दिल्लीत गौरव
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते “द प्राईड ऑफ इंडिया बाबू जगजीवन राम” अवॉर्ड प्रदान
मालवण : मालवण कुंभारमाठ गावचे सुपुत्र उत्तम फोंडेकर यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रस्तरावरील भारत सरकार मंत्रालयाकडून जाहीर झालेला द प्राईड ऑफ इंडिया बाबू जगजीवन रामअवॉर्ड रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि दिल्ली कृषी आयुक्त यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी २५ वर्षे अनुभव आणि त्या क्षेत्रातील अतिउल्लेखनीय कार्य असावे लागते. पण उत्तम फोंडेकर यांच्या पहिल्या हापूस पेटीची “इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद झाल्यामुळे त्यांना ५ वर्षाच्या आतच हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल उत्तम फोंडेकर यांचे याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. कोकण विभागात हापूस आंब्याच्या बाबतीत प्रथमच हा अवॉर्ड आहे.