मोदी@9 विकास तीर्थ रॅलीने सिंधुदुर्ग भाजपात नवचैतन्य…

झाराप झिरो पॉईंट ते ओरोस फाटा मोटरसायकल रॅलीत भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत शनिवारी झाराप झिरो पॉईंट ते ओरोस फाटा मार्गावर विकास तीर्थ रॅली काढण्यात आली. भाजपचे कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाल्याने सिंधुदुर्ग भाजपात नवचैतन्य पाहायला मिळाले.

मोदी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर आणि पूर्ण झालेल्या मुंबई गोवा महामार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व भाजप नेते निलेश राणे यांनी केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते विशाल परब, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, आनंद शिरवलकर, मनोज रावराणे, रणजीत देसाई, संजू परब, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, दीपक नारकर, धोंडू चिंदरकर यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!