बनवाबनवी … अशी ही बनवाबनवी … !

आ. वैभव नाईकांची बनवा बनवी मनसेने केली उघड ; माहितीच्या अधिकारात खुलासा

मालवण | कुणाल मांजरेकर

आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी कणकवली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली किती निधी मंजूर झाला, देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता आदी बाबींबाबत माहिती मागविली होती. सदर घोषणा फसवी असुन माहितीच्या अधिकाराखाली ही बाब उघड झाली आहे. आम. वैभव नाईक जनतेसोबत बनवाबनवी करत असल्याचा आरोप मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

श्री. इब्राम पूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार वैभव नाईक यांनी पुढीलप्रमाणे रस्ते मंजुरीची घोषणा केली होती. यात मालवण तालुका- कोळंब राजकोट मार्ग इजिमा ३६ संरक्षण भिंत रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे दहा १० लाख, बिळवस सातेरी मंदिर ग्रा.मा. २६९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, किर्लोस-धनगरवाडी-भरडवाडी ग्रा.मा. १११ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख , राठीवडे हरिजन वाडी व पुजारेवाडी ग्रा.मा. १४७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख,ओझर-रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब ग्रा.मा. २३१ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, ओझर कायदा शाळा कुंभार कुरले ओझर- खैदा- साळकुंभा कुरले भाटले नांदरुख ग्रा.मा. मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाड रस्ता ग्रामा मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, पेंडूर-रायवाडी -मुगचीवाडी वेताळ मंदिर ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख तर कुडाळ तालुका – डिगस किनळोस ग्रामा मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, कुंदे हरिजन भटवाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, कुपवडे गवळवाडी तोरबवाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, पडवे चिरेखाण ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, गावराई तेलीवाडी, कुळकरवाडी, थळकरवाडी, टेंबवाडी बौद्धवाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, भडगाव खुर्द ब्राह्मणवाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, पांग्रड काजीमा चे टेंब ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, कडावल तावडेवाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, कालेली हरिजन वाडी ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, मोरे बांदेकरवाडी मार्ग ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, तसेच ओसरगाव असरोंडी मार्ग ग्रा.मा. मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ९ लाख, व अन्य गावातील रस्ता कामे मंजूर करण्यात आली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्याच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांचे पदाधिकारी विकासकामांवरील बंदी उठवण्याबाबत बोलतात तर वैभव नाईक ५ कोटींचा निधी मंजुर झाल्याची खोटी माहिती देतात. हा सर्व प्रकार जनतेला गृहीत धरून फसवणुकीचा असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!