गावराईतील विकास कामांचे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंची ग्वाही
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान अंतर्गत मंजूर नळपाणी योजनेचा व जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावराई येथे पार पडला. यावेळी श्री. राणे यांनी श्रीफळ वाढविण्याचा मान गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सोनल शिरोडकर यांना दिला. यावेळी श्री देव गिरोबा मंदिर येथे बोलताना गावराई गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही याची हमी त्यांनी दिली.
यावेळी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी सभापती अंकुश जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, सरचिटणीस देवेंद्र सामंत, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रिया वालावलकर आदी उपस्थित होते.