मालवण शहरातील ४१ लाखाच्या विकास कामांची भूमिपूजने ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
धुरीवाडा, रेवतळे येथील कामांचा समावेश ; नागरिकांनी मानले आभार : तारकर्ली येथील १० लाखाच्या शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा ते स्मशानभूमी रस्त्याचेही उदघाटन
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा आणि रेवतळे येथील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी आ. नाईक यांचे आभार मनात त्यांचा सत्कार केला.
आ. नाईक यांच्या प्रयत्नांतून धुरीवाडा काजू फॅक्टरी गारुडेश्वर ते वझे घर उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण व आधारभिंत बांधणे या कामासाठी १६ लाख ४२ हजार रु.निधी आणि रेवतळे जंक्शन ते मांजरेकर घर ते गाड घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे व अंतर्गत गटार बांधकाम करणे या कामासाठी २४ लाख ६४ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. धुरीवाडा येथील कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर रेवतळे येथील कामाचे भूमिपूजन आ. नाईक यांच्या उपस्थितीत फादर विल्सन यांच्या हस्ते करण्यात आले.
तारकर्ली येथे शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा ते स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १० लाख रु निधी मंजूर केला असून हे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उदघाटन करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. यावेळी महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरोसकर, नितीन वाळके, रश्मी परुळेकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर, सिद्धू मांजरेकर, नरेश हुले, महिला तालुका संघटक दीपा शिंदे,सन्मेश परब, महेंद्र म्हाडगूत, यशवंत गावकर, पॉली गिरकर, शीला गिरकर, नंदा सारंग, महेश जावकर, बाबू वाघ,सुहास वालावलकर, विजय मांजरेकर, सुभाष मिठबावकर, अंतोन फर्नांडिस, विल्सन आदी उपस्थित होते.
तारकर्ली येथे सरपंच मृणाली मयेकर, ग्रा.प.सदस्य अनघा कुबल, स्नेहाली केळुसकर, तन्वी मेस्त्री, प्रेरणा सावंत, दिगंबर मालंडकर, शाखाप्रमुख आबा केळुसकर, राजू मेस्त्री, संदीप भोवर, गजानन कुबल,भाई कुबल, भिवा कोळंबकर, भानू केळूसकर,सुरेश बापर्डेकर, प्रभाकर रासम, बाबू टिकम आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.