Category सिंधुदुर्ग

मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांना आलेल्या नोटीस प्रश्नी आ. निलेश राणेंच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक संपन्न

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको – पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना सिंधुदुर्ग–मालवणसह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्धअसल्याची शासनातर्फे ग्वाही मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत. ती नियमित…

डॉ. शिल्पा झाटये यांची वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्यिक क्षेत्रात नवी भरारी

१०० कवितांच्या इंग्रजी काव्यसंग्रहातून निसर्गातील अमूल्यतेची जाणीव ; १ मार्चला प्रकाशन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झाटाये यांनी वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच साहित्यिक क्षेत्रात भरारी घेत तब्बल शंभर इंग्रजी कवितांचा संग्रह निर्माण केला आहे.…

अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा व काजू पिकाला धोका

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला…

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी अमित खोत यांची निवड

मालवण : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्यावतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार…

मोटरसायकलवर अनधिकृत गाद्यांचा लोड घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

मालवण मधील जागरूक तरुणांचा पुढाकार मालवण : शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या पाच परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण शहरात काही परप्रांतीय विक्रेते मोटरसायकलवर…

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या फायद्याचा की तोट्याचा हा विचार करण्याची वेळ… !

‘एमआयटीएम’ कॉलेजच्या पदवीदान सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे परखड मत ; रोजगारावर परिणाम होण्याची भीती माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्वाचे ; विद्यार्थ्यांनी जीवनात विनम्रतेचे आचरण करण्याचा सल्ला मालवण | कुणाल…

आ. निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गोळवण परबवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून गोळवण परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार…

हरी खोबरेकरांची वायफळ बडबड : मोदींच्या दौऱ्यामुळे झोपड्याना नोटीसा पाठवल्याचा पुरावा द्या

दामोदर तोडणकर यांचे आव्हान ; खा. राणे यांच्यामुळेच दांडी आवारवाडी अस्तित्वात, नाहीतर केव्हाच जमीनदोस्त झाली असती : देवबागचे स्थलांतरण देखील राणेसाहेबांनीच रोखले आपल्या १० वर्षात किनारपट्टीवर नोटीसा आल्या नसल्याचं वैभव नाईक खोटं का बोलले, याचे उत्तर खोबरेकरांनी द्यावं मालवण |…

कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश ; कोकणातील आंबा बागायतदारांना शासना मार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्याची ग्वाही मुंबई : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पीकाला मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व…

खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ व ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर कायदा करा…

सकल हिंदू समाजातर्फे मालवणात तहसीलदारांना निवेदन मालवण : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि विविध महिला संघटनांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरती मधील उमेदवारांच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर

२८ फेब्रुवारी रोजी दहा केंद्रांवर होणार परीक्षा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या…

error: Content is protected !!