टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली क्रिकेटची पंढरी

नवी दिल्ली : लॉर्ड्स कसोटीत दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान हे या विजयाचं वैशिष्ट्य होतं.
इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं होतं. मात्र या कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन करत बाजी मारली.
पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूने होतं. भारतीय संघाने 181/6 वरून पुढे खेळायला सुरुवात केली. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध ऋषभ पंत अर्ध्या तासात माघारी परतल्यानंतर भारताचा दुसरा डाव झटपट गुंडाळला जाणार अशी चिन्हं होती. मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद 89 धावांची भागीदारी करत इंग्लंडला पिछाडीवर टाकलं. शमीने कारकीर्दीतील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. शमीने 56 तर बुमराहने 34 धावांची खेळी केली.

Leave a Reply

error: Content is protected !!