बॅनरचं उत्तर बॅनरनेच ! शिवसेनाही एक्शन मोड मध्ये !
देवगडमधील “त्या” बॅनरला शिवसेनेकडून कणकवलीत बॅनरनेच उत्तर
कणकवली शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळील “तो” बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
कणकवली : सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात एकमेकां विरोधी घोषणाबाजीच्या ठसन नंतर आता बॅनर वॉर रांत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवगड येथे “ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार” “‘दादा’गिरी” या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. “ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले, ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार” अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना शाखेजवळ लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.
या बॅनरच्या वरील बाजूला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे १९ ऑक्टोबर २०१४ रोजी “जायंट किलर” असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात उचलून घेतानाच्याही फोटोचा समावेश आहे. तर बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देताना चा फोटो दाखविण्यात आला आहे. त्यामुळे देवगड येथे लागलेल्या “त्या” बॅनरला बॅनरनेच शिवसेनेकडून कणकवलीत उत्तर देण्यात आले आहे. हा बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.