मालवण शहराच्या प्रत्येक वॉर्डात नगरपालिका बसवणार बेंचेस !

यतीन खोत यांच्या उपस्थितीत भरड नाका येथे शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या नियोजनातून मालवण शहरातील प्रत्येक वॉर्डात नागरिकांना बसण्यासाठी प्रत्येकी दोन बेंच बसविण्यात येत आहेत. मालवण भरड नाका आणि भरड दत्त मंदिर येथे बेंच बसवून या कामाचा शुभारंभ नगरसेवक यतीन खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये मालवण शहरातील प्रत्येक प्रभागात नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येकी दोन बेंच बसविण्यात येणार आहेत. हे बेंच सिमेंटचे असून मोक्याच्या ठिकाणी विश्रांतीसाठी बसण्यासाठी नागरिकांना या बेंचचा उपयोग होणार असल्याचे यतीन खोत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!