आयुष्य झिजवलं तरी कोकण वासियांचं प्रेम विसरू शकत नाही ; नारायण राणेंचे भावोद्गार

कट्टा बाजारपेठेत राणेंचे जल्लोषात स्वागत

कट्टा : कोकणच्या जनतेनं १९९० पासून आजपर्यंत दिलेल्या प्रेमामुळेच मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे मला मिळाली. ही पदे कोकण वासीयांमुळे मिळाली. त्यामुळे मी माझं आयुष्य पूर्ण झिजवलं तरी ते ऋण मी फेडू शकत नाही असे भावोद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कट्टा बाजारपेठेत बोलताना काढले.

     कट्टा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं शनिवारी रात्री आगमन झालं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, भाजप जिल्हाधक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, सभापती  अजिंक्य पाताडे, सरपंच स्वाती वाईरकर, आशिष हडकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
      यावेळी माजी जि. प. सभापती श्रावणी नाईक, राजन माणगावकर, संजय नाईक, मकरंद सावंत, ऋषी पेणकर, सर्व ग्रा.प सदस्य, सुमित सावंत, दीपा सावंत, आतिक शेख, सतीश वाईरकर, महेश वाईरकर, बंडू माडये, व्यापारी संघ पदाधिकारी अरविंद नेवाळकर, शेखर पेणकर, अशोक गाड आदींनी ना. राणे यांचे स्वागत केले. 


    यावेळी केंद्रीय मंत्री ना. राणे पुढे म्हणाले, कोकणच्या एका सुपुत्राला दिल्लीत बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले.आज दीड महिन्यानंतर मी तुमच्या भेटीला येत आहे. मला माझ्या सहकाऱ्यांची, तुमची, दिल्लीत असताना सारखी आठवण यायची, त्यामुळे मी कसा राहिलो हे माझे मलाच माहीत आहे. माझ्या आयुष्यात उपकार करणारे, मदत करणारे, प्रेम करणारी तुमच्या सारखी मंडळी भेटली. त्यामुळेच तुमचे ऋण मी विसरू शकत नाही, असे सांगत ते पुढे म्हणाले, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यात ८० टक्के उद्योग येत असल्याने कोकणात आपण उद्योग निर्माण करणार आहोत. इथल्या तरुण तरुणींनी नोकऱ्या शोधत न बसता उद्योग धंदे सुरू करावेत,असे आवाहन त्यांनी केलं.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!