पंतप्रधान मोदीं पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही सन्मान !

टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये निवड ; इंडिया टुडेच्या सर्व्हेक्षणात जाहीर

मुंबई : अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मान्यता मिळाली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील असाच सन्मान मिळवला आहे. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये ठाकरेंच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत.

इंडिया टुडेनं प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल विचारणा केली. ४३ टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटनायक यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के जनता समाधानी आहे. तिसऱ्या नंबरवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर ६७.५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. ६१.८ टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत. केरळचे मुख्यमंत्री (६१.६ टक्के) यादीत पाचव्या, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (५७.९ टक्के) सहाव्या स्थानी आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्वर्मा ५६.६ टक्के गुण मिळवून सातव्या क्रमांकावर आहेत. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (५१.४ टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४.९ टक्के) अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!