रस्त्यावरील लोखंडी गेट हटवण्यासाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
वैभववाडी (प्रतिनिधी)
मुख्य रस्ता ते कुसुर टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट बसवून बंद करण्यात आल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. योग्य तोडगा पडल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी आणि ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी खुला करून मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
याबाबत रंवार ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन वर्षापासून लोखंडी गेट लावून बंद असलेला सदर रस्ता सुरु करण्यात आला नाही.
उपोषणस्थळी श्रीरंग पाटील, विष्णू साळुंखे, पुंडलिक साळुंखे, तेजस साळुंखे, धाकू पाटील, समाधान पाटील, सुभाष पाटील, गुणाजी पाटील, सिताकांत साळुंखे, दिग्विजय साळुंखे, योगेश साळुंखे, देवेंद्र साळुंखे, विनायक साळुंखे, रमाकांत पाटील, प्रभाकर पाटील, प्रदिप पाटील, नारायण पाटील, मनोहर तावडे, पोलिस पाटील रवींद्र पाटील, चंद्रकांत पाटील, हनुमंत कदम आदी ग्रामस्थ उपस्थित आहेत.