मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे आणि मत्स्य खात्याची संवेदनशील तत्परता


पारंपारिक मच्छिमारांच्या कुटुंबीयास मिळवून दिले सात आठवड्यामध्ये पाच लाख रुपये ; भाजपा मच्छीमार सेलच्या वतीने पाठपुरावा
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी येथील संतोष सारंग या पारंपारिक मच्छीमाराचा 2 मार्च 2025 रोजी मासेमारी करताना बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे .पारंपरिक मासेमारी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. याची संवेदनशील दखल मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांनी घेऊन मत्स्य उद्योग खात्यास तात्काळ अपघात गट विमाच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची निर्देश दिले. मत्स्य खात्याने तातडीने पावले उचलत महाराष्ट्र शासन अंतर्गत रुपये एक लाखाचा प्रस्ताव व केंद्र शासन अंतर्गत पाच लाख रुपयांचा प्रस्ताव अवघ्या दोन आठवड्यात तयार करून राज्य व केंद्र शासनाकडे पाठवला. यानंतर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाने त्याचा योग्य पाठपुरावा केल्यामुळे अवघ्या सात आठवड्यामध्ये पारंपारिक मच्छीमारांच्या कुटुंबीयास रुपये पाच लाख चा अपघात गट विमा नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैदराबाद यांनी मंजूर केला. लवकरच राज्य शासनाकडून एक लाख रुपये मंजूर होतील असे मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी सांगितले.संपूर्ण पाठपुराव्याच्या प्रक्रियेमध्ये मत्स्यव्यवसाय खात्याचे सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त श्री सागर कुवेसकर, देवगड परवाना अधिकारी पार्थ तावडे, सागरी सुरक्षारक्षक धाकोजी खवळे तसेच प्रादेशिक उपयुक्त श्री.नागनाथ भादुले, सह.आयुक्त श्री.युवराज चौगुले आणि श्री.महेश देवरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्रस्ताव लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी चे स्थानिक पदाधिकारी ज्ञानेश्वर खवळे तसेच बाळा खडपे यांनी विशेष प्रयत्न केले. तारा मुंबरी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू यांनी सुद्धा पाठपुरावा केला.

मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विभाग यांच्या संवेदनशील तत्परतेमुळे देशातील आतापर्यंतची सर्वात जलद अपघाती मृत्यूतील राज्य व केंद्र शासनाची आर्थिक पारंपारिक मच्छीमारास मदत मिळू शकली. याबद्दल संबंधित विषयाचा पाठपुरावा करणाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलकडून आभार व्यक्त करीत असल्याचे मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक
रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.

