खोटले गावात “अंदर बाहर” जुगारावर एलसीबीची धडक कारवाई ; १३ आरोपी अटकेत तर दोन पसार

रोख रक्कम, ४ चारचाकी वाहने, एक दुचाकी वाहनांसह ३७ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

मालवण : मालवण तालुक्यातील खोटले धनगरवाडी डोंगराळ भागातील माळरानावर सुरु असलेल्या अंदर बाहर जुगाराची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री १.१० वा. याठिकाणी छापा टाकून अंदर-बाहर जुगार खेळ खेळत असलेल्या १३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेवून जंगलात पळुन गेले. आरोपींकडून अंदर-बाहर पट जुगारावरील रोख रक्कम, जुगाराचे साहीत्य असे १ लाख ४३ हजार ३९० रुपये तसेच मोबाईल फोन, १ मोटार सायकल व ४ चारचाकी वाहने मिळून एकूण ३७ लाख ५८ हजार ६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत मालवण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

अटक आरोपीमध्ये अनुक्रमे 1. गुरुनाथ साबाजी नाईक, वय 22, रा. आरोस, ता. सावंतवाडी, 2. रामचंद्र सदाशिव गुरसाळे, वय-63, रा. पटकीदेबीजवळ, ता. कणकवली, 3. महेश सुंदर आंबेरकर, वय-40, रा. पुढारी ऑफीस बिल्डींग, ता. कणकवली, 4. संजय श्रीधर साळगांवकर, वय-50, रा. कट्टा, ता. मालवण, 5. गणेश सोमा पालव, वय-37, रा. मसुरे, ता. मालवण, 6. बाळकृष्ण पांडुरंग बर्दम, वय-68, रा. सातोसे, ता. सावंतवाडी, 7. संतोष बाळकृष्ण कुडतरकर, वय. 53, रा. माणगांव, ता. कुडाळ, 8. सुरेश श्रीधर कवठणकर, वय 52, रा. कवठणी, ता. सावंतवाडी, 9. रोहीत राजेंद्र गराटे, वय-29, रा. कासार्ड, ता. कणकवली, 10. भिमसेन तुळजाराम इंगळे, वय-41, रा. कलमठ, ता. कणकवली, 11. प्रशांत प्रकाश चव्हाण, वय-40, रा. मसुरे ता. मालवण, 12. तुषार नंदकुमार मसुरकर, वय-34, रा. कलमठ, ता. कणकवली, 13. अक्षय नारायण चव्हाण, वय 35, रा. कुमामे, ता. मालवण, 14. संदिप गोळवणकर, रा. कांबळेगल्ली, ता. कणकवली, 15. तुकाराम खरात, रा. कलमठ, ता. कणकवली यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक समिर भोसले, सुधीर सावंत व रामचंद्र शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, गुरुनाथ कोंयडे, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद राणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार व चंद्रकांत पालकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्या पथकाने एकत्रितरित्या केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलीस करीत आहेत. यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाचप्रकारे जुगार, मटका, दारु, अंमली पदार्थ किंवा तत्सम अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीबाबत गोपनीय माहीती घेवून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे सिंधुदुर्ग पोलिसांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4230

Leave a Reply

error: Content is protected !!