कट्टा जि. प. केंद्रशाळेला आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून संगणक संच प्रदान


आ. निलेश राणेंचा पाठपुरावा : पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ओरोस येथे वितरण
मालवण | कुणाल मांजरेकर

जिल्हा परिषद केंद्रशाळा कट्टा प्रशालेला आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून एक संगणक संच प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण आज ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. जि. प. केंद्रशाळेने याची मागणी केली होती. आमदार निलेश राणे यांनी याचा पाठपुरावा करून आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक संच प्राप्त करून दिला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश वाईरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिनेश ठाकूर यांच्याकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते संगणक संच सुपूर्द करण्यात आला.
संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे तसेच पाठपुरावा केल्याबद्धल आमदार निलेश राणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी आभार मानले आहेत.

