माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २५ मार्चला रोंबाट


मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २५ मार्च रोजी रात्री ८.३० वा. विरण बाजारपेठ वाडकर मैदान येथे नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या रोंबाट कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोईप जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

