श्री.संत गोरा कुंभार समाज चषक क्रिकेट स्पर्धेचे 23 मार्चला मालवणात आयोजन


मालवण प्रतिनिधी
संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा मर्यादित श्री संत गोरा कुंभार समाज चषक क्रिकेट स्पर्धा २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कुंभार समाज उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी दिली.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष नारायण साळवी, उद्घाटक म्हणून ओम कुंभार, रामदास सांगवेकर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, प्रदेश सचिव विलास गुडेकर, प्रदेश क्रीडाध्यक्ष रामदास सांगवेकर, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, महिला जिल्हाध्यक्ष करुणा चिंदरकर, पत्रकार आघाडी उपाध्यक्ष दिलीप हिंदळेकर, संपर्कप्रमुख गणपत शिरोडकर, माजी अध्यक्ष बाबुराव पाटकर, संचालक सल्लागार साबा पाटकर, सुनील पाटकर, नाथा मळगावकर, महादेव वावळे, कुंभार समाज उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर, विलास मांजरेकर, सचिन हरमलकर, दिगंबर वावळीये आदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघास ११,००१ रुपये, चषक उपविजेत्या संघास ७००१ रुपये, चषक दिला जाणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आंबा व्यावसायिक ओम कुंभार तर चषक जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी पुरस्कृत केले आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदेश क्रीडाध्यक्ष रामदास सांगवेकर तर चषक प्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर यांनी पुरस्कृत केले आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक वासुदेव आटक यांच्या स्मरणार्थ कपिल आटक यांनी पुरस्कृत केला आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, मालिकावीर, अंतिम सामनावीर, पंच, समालोचक स्मृतिचिन्ह समाजसेवक सचिन हरमलकर यांनी पुरस्कृत केली आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, अंतिम चषक सामनावीर यांना महेश कुपेरकर यांजकडून इस्त्री दिली जाणार आहे. मालिकावीरास चांदणी कुंभार यांजकडून फॅन टॉवर दिला जाणार आहे. सहभागी संघास महादेव वावळे यांजकडून स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सांगवेकर यांनी केले आहे.


