पाट येथे आजपासून आमदार चषक बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज सायंकाळी होणार उदघाट्न
वेंगुर्ला : श्री देवी आई सातेरी व दत्ता सामंत मित्रमंडळ पाट यांच्या वतीने देवी सातेरी आई मैदान पाट देसाईवाडा येथे २० ते २२ मार्च या कालावधीत पंचक्रोशी मर्यादित भव्य दिव्य एक गाव एक ग्रामपंचायत नाईट अंडरआर्म बॉक्स आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाट्न शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आज सायंकाळी ७ वाजता होणार आहे.


या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 15,555/- (संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती कुडाळ व भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष, कुडाळ पुरस्कृत) तर द्वितीय क्रमांकास 7,777/- (मंगेश उर्फ भाऊ पोतकर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत), तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 3333/- (समीर दत्ताराम धुरी उपसरपंच, ग्रामपंचायत पाट परबवाडा पुरस्कृत) दिले जाणार आहे. स्पर्धेतील चषक दत्ता सामंत मित्र मंडळ पाट यांच्यावतीने पुरस्कृत केली आहेत. या शिवाय अन्य वैयक्तिक पारितोषिके देखील दिली जाणार आहेत.

