मुस्लिम जिहाद्यांचे वकीलपत्र न घेणाऱ्या मालवण बार असोसिएशनचे आ. निलेश राणे यांनी मानले आभार

मालवण : भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यावेळी भारत विरोधी घोषणा देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या परप्रांतीय मुस्लिम आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय मालवण तालुका बार असोसिएशनने घेतला आहे. या निर्णयाबाबत कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी समाधान व्यक्त करीत बार असोसिएशनचे आभार मानले आहेत.

मालवणात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतानाच राष्ट्रविरोधी घोषणाबाजी झाल्याने केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्यात खळबळ उडाली आहे. या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध होत असून मालवण मधील मुस्लिम बांधवानी देखील या प्रकरणी निषेधाचे पत्र मालवण पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाला सादर केले आहे. आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत देशविरोधी घोषणा देणाऱ्या जिहादी मुसलमानांचा भंगार डेपो जेसीबी लावून उध्वस्त करून टाकला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी तिघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मालवण तालुका वकील संघटनेने या आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय घेत राष्ट्रभक्ती दाखवून दिली आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून आ. निलेश राणे यांनी पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, “मी मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन करतो. मालवण मधील वकिलांनी भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आरोपी मुसलमानासाठी वकीलपत्र न देण्याचा निर्णय घेतला. देशभरात हे उदाहरण गाजलं पाहिजे, परत एकदा मनापासून आभार”. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4255

Leave a Reply

error: Content is protected !!