एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रेक्स व मेट्रोपल्स २०२५ चे उद्घाटन


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ; प्रात्यक्षिके, प्रकल्पांचे सादरीकरण
मालवण : सुकळवाड (ओरोस) येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे रेक्स व मेट्रोपल्स या टेक्निकल व नॉन टेक्निकल कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक अनंत सावंत यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात विविध विभागातील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके, प्रकल्प आदीचे सादरीकरण केले.


याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम, खजिनदार सौ. वृषाली कदम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, उपप्राचार्य सौ. पुनम कदम आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. रेक्स या नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट मॉडेल कॉम्पिटिशन मध्ये सादर झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर नाविन्यपूर्ण सादरीकरण केले आहे. आणि मेट्रोपल्स २०२५ मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विभागातून या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ड्राफ्टिक्स सिव्हिल, ऑटोकेंड, कोड वॉर, सर्किट मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन, इंस्टा रील, स्पॉट फोटोग्राफी, वेलीबॉल, पोस्टर मेकिंग, रांगोळी, डेबिट, मिनीमिलिशिया, ट्रेसर हंट, बिझीएमआय यासारखे कार्यक्रम घेण्यात आले. अनंत सावंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना टेक्निकल मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम सेक्रेटरी सौ. नेहा पाल, खजिनदार सौ. वृषाली कदम, विश्वस्त केतन कदम आणि प्राचार्य डॉ. एस.व्ही. ढणाल यांनी सर्व विद्याथ्यर्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

