झारापमध्ये उद्या निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती


कुडाळ : मुंबई.गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट वरील चहा टपरीवर मुस्लिम कुटुंबातील काहींनी पर्यटकांना अमानुष मारहाण केल्याच्या घटनेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात संतापाचे सूर उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्री देवी भावई मंदिर, झाराप येथे “सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती” आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी उद्या दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३.३० मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल आरएसएन कुडाळ येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

