शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हिर्लोकमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम : नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे सौजन्य

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवाजी विद्यालयाला सभामंडप बांधून देणार : दत्ता सामंत यांची ग्वाही

कुडाळ | कुणाल मांजरेकर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील शिवाजी विद्यालयातील मुलांना सायकल वितरण करण्यात आले. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबवण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या शाळेला आवश्यक असलेला सभामंडप बांधून देण्याची घोषणा यावेळी दत्ता सामंत यांनी केली.

यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, दीपक नारकर, महेश परब, योगेश तुळसकर, दादा साईल, अरविंद करलकर, रचना नेरूरकर, सिद्धी शिरसाट, गुरूदास कुसगावकर, सूर्यकांत नाईक, केशव नारकर, पंढरीनाथ सावंत, बाजीराव झेंडे, महादेव परब, योगेश परब, मोहन परब, शिवराम गुरव, रवींद्र देसाई, प्रकाश सावंत, नागेश आईर, पदू कोळेकर, नरेंद्र राणे, चंद्रकांत सावंत, प्रशांत सरनोबत, सुधाकर सावंत, सुभाष सावंत यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4242

Leave a Reply

error: Content is protected !!