मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा


नेत्र चिकित्सा, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्त तपासणी शिबीर, ११६ रुग्णांनी घेतला लाभ ; ६१ जणांना चष्मा वाटप
मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेत्र चिकित्सा, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. याचा ११६ जणांनी लाभ घेतला. तर या प्रसंगी ६१ जणांना चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, कुडाळ मालवणचे क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, उपतालुकाप्रमुख पराग खाेत, शाखाप्रमुख शशांक कुमठेकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, उपजिल्हाप्रमुख निलिमा शिंदे, तालुकाप्रमुख आशा वल्लप्पी, युवती जिल्हाप्रमुख साै. साेनाली पाटकर, आचरा विभाग प्रमुख सायली राणे, विभाग प्रमुख साै. निकीता ताेडणकर, लुड्डीन फर्नांडिस, दीपाली काेळथरकर, उपतालुकाप्रमुख गिता नाटेकर, आनंद खवणेकर, हरी खवणेकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

