१९९० पासून नारायण राणेंनी लावलेला विकासाचा झपाटा आता पुन्हा दिसेल का ?

नितेश राणेंच्या मंत्री पदाच्या पार्श्वभूमीवर मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा सवाल

मालवण | कुणाल मांजरेकर

१९९० मध्ये जिल्ह्यात आमदार म्हणून नारायण राणे यांची एंट्री झाली आणि लाल रस्त्याचे डांबरीकरण झाले आणि जिल्ह्याचा विकास झाला हे सिंधुदुर्गातील जनता कधीही नाकारणार नाही. परंतु नारायण राणेंचा पराभव झाला आणि विकासाला चाप लागला. आता त्याच विकासाला गती देण्याचं काम विद्यमान कॅबीनेट मंत्री करतील का ? असा सवाल मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केला आहे

रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प तसेच सद्या बंद पडलेली मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा याकडे विद्यमान मंत्र्यांनी लक्ष देऊन याबाबी पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आहेत. म्हणून याची गांभीर्याने दखल घ्यावी. सध्या जिल्ह्यात असलेली बेरोजगारी, विकासकामाला बसलेली खीळ या सर्व गोष्टीला चालना देण्याच काम मंत्रिमहोदय करतील अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करीत आहोत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून आज जगाच्या नकाशावर झळकत आहे. परंतु सध्या जिल्ह्यात पर्यटकांचा येणारा ओघ कमी झाला आहे. मुंबईहून येणारी विमान सेवा बंद पडली आहे. रस्त्यांची जिल्ह्यात दुरवस्था झाली आहे. या सर्व गोष्टी नीट आणि सुरळीत कण्याचे काम मंत्रीमहोदयांनी कराव एवढीच अपेक्षा जिल्हावासियांच्या वतीने व्यक्त करतो. भविष्यात एक सुजलाम अन सुफलाम सिंधुदुर्ग जिल्हा व्हावा हीच अपेक्षा बाळगतो, असे मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!