मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे अशोक सावंत यांनी केले स्वागत
खा. नारायण राणे यांची देखील घेतली सदिच्छा भेट
मालवण : राज्याच्या मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ना. नितेश राणे आज प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांनी ना. नितेश राणे यांची ओरोस येथील भाजपा जिल्हा कार्यालयात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच कणकवली येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची देखील भेट घेऊन विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.