जिल्हा रुग्णालयात आयोजित कान, नाक, घसा तपासणी शिबिराचा ८० जणांनी घेतला लाभ
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इतर प्रवर्गातील ० ते १८ वयोगटातील कान, नाक, घसा (ENT) तपासणी शिबीर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे शुक्रवारी घेण्यात आले. या शिबिरामध्ये ८० जणांची कानाच्या विकाराची तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ज्या मुलांच्या उच्चारात विकास झालेला नाही, मोठ्या आवाजांना प्रतिसाद देत नाही, श्रवणयंत्राचा फायदा होत नाही अशा मुलांची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केली.
कान हा शरीराचा अत्यावश्यक भाग असून बालपणीच मुलांची आवश्यक शस्त्रक्रिया झाल्यास भविष्यात मुलांचा कान पूर्ण बरा होऊ शकतो. जन्मापासून ऐकण्याच्या समस्या असणाऱ्या मुलांना कोकलर इंप्लांट सारख्या शस्त्रक्रियेने ऐकू येऊ लागले आहे. अडीच वर्षाच्या आतील मुलांना या शस्त्रक्रियेचा लाभ घेता येईल आणि मूल सामान्य मुलासारखे ऐकू लागेल असे डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले. या शिबिरास जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. श्याम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क वर्ग १ सुबोध इंगळे, डॉ शाम राणे (ENT सर्जन), डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. कबीलन, डॉ .प्रशांत सवदी (DPM) निलेश गावडे (DAM), राजेश पारधी , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक, विक्रम कांबळे (DEIC मॅनेजर), डॉ मुक्ता दुधगावकर, डॉ पारवे, डॉ ढोके श्रीम दीपा विजयन (ऑडिओलॉजिस्ट), श्रीम स्वाती रावले (ऑडिओमेट्रिशिअन), विश्वनाथ राव, श्रीम एकता वराडकर व आरबीएसके टीम उपस्थित होते.