आभाळमाया ग्रुपचा विक्रम | सलग चौथ्यावर्षी गाठला २०० रक्तदात्यांचा टप्पा ; तब्बल २३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
वराडकर हायस्कूल कट्टा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; आभाळमाया ग्रुप व जी एच फिटनेस कट्टा यांच्या वतीने आयोजन
माजी आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बाळा चिंदरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची शिबिराला भेट
मालवण : सहकारमहर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने वराडकर हायस्कूल कट्टा येथे रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यापूर्वी आभाळमायाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराना देखील २०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग लाभला होता. सलग चौथ्या वर्षी देखील आयोजित या शिबिराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, हॉटेल व्यवसायिक संजय गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आभाळमाया ग्रुपचे सर्वेसर्वा राकेश डगरे, जी. एच. फिटनेस कट्टाचे गौरव हिर्लेकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, डॉ. सोमनाथ परब, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, ट्रस्टच्या सचिव सौ.मनीषा साळगावकर, माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, श्रीमती रेखा डीचोलकर, अध्यक्ष श्रीमती राजश्री उर्फ बेबी डगरे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्हाध्यक्षा मानसी परब, स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्युटच्या संचालिका सौ. श्रद्धा नाईक, सौ. दिया ढोलम, सौ. राणी डगरे, वराड सरपंच सौ.शलाका रावले, वराड उपसरपंच गोपाळ परब, भाजप वराड शक्ती केंद्रप्रमुख राजन माणगावकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे जयंत जावडेकर, विष्णू लाड, वराड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित उर्फ छोटू ढोलम, कट्टा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गुराम, कला शिक्षक समीर चांदरकर, मिराशी सर, उद्योजक समीर रावले, उद्योजक प्रवीण मिठबावकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जगन चव्हाण, पोलिस नाईक नितीन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना संजय गावडे म्हणाले, अन्नदान आणि रक्तदानासारखे श्रेष्ठ दान दुसरे कुठचे नाही. आभाळमाया ग्रुप प्रथम वाडी नंतर गाव नंतर जिल्हा आणि आता महाराष्ट्रभर आपलं कार्य करत आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी राकेश डगरे आणि आभाळमाया ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करून स्वतः आभाळमाया ग्रुपचे सदस्य असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिरास सकाळपासूनच अनेक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी हजेरी लावली आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
रक्तदान शिबिराला मान्यवरांची उपस्थिती
आभाळमाया ग्रुपच्या या रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत वराड गावचे सुपुत्र उद्योजक बाळा चिंदरकर, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर, मिठबावचे माजी सरपंच भाई नरे, भाई सावंत, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, देवगड पी.एस.आय. अण्णा दरवेश , मनोहर मयेकर, कुणकवळे सरपंच मंदार वराडकर, विनोद सांडव, अर्जुन चिंदरकर हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर कुडाळ मालवण विधानसभेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मंदार केणी, उद्योजक बिजेंद्र गावडे, विश्वजीत चिंदरकर, ओमकार येरम हे सुद्धा उपस्थित होते.
एन.डी.आर.एफ. टीमचे निरीक्षक राजू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली NDRF च्या जवानांनीही या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले. तब्बल 235 रक्तदात्यांनी रक्तदान करून यशस्वी केलेले हे रक्तदान शिबिर सुरळीत पार पडण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सर्व सदस्य, वराडकर हायस्कूल कट्टाचे सर्व शिक्षक, ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, इंग्लिश मीडियमचे शिक्षक, सीनियर कॉलेजचे प्राचार्य आणि सहकारी प्राध्यापक, एनसीसीचे पथक प्रमुख श्री. राऊळ सर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच जीवनधारा रक्तपेढी कोल्हापूर, जिल्हा रुग्णालय ओरोस रक्तपेढी, आणि एस. एस. पी. एम. हॉस्पिटल पडवे रक्तपेढी, ग्रामविकास मंडळ कावळेवाडी, वराडकर हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांचेही सहकार्य लाभले. तसेच स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा आणि संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले
या रक्तदान शिबिरानिमित्त अमित चव्हाण यांनी उभारलेला सेल्फी पॉइंट आणि वराडकर हायस्कूल कट्टा कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी साकारलेला रक्तदान शुभंकर हे आकर्षणाचे केंद्र ठरले. या रक्तदान शुभंकराने रक्तदात्यांमध्ये उत्साह वाढवला. तसेच आभाळमाया ग्रुपच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर सौ.वीणा शिरोडकर मॅडम यांनी बनवलेली चित्रफीतही लक्ष वेधून घेत होती, एनसीसीचे विद्यार्थी यांनीही कार्यक्रमाला शोभा आणली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले.