शिरवंडेमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निलेश राणेंचा विजय हा काळ्या दगडावरील रेघ, ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळणार : माजी सभापती सुनील घाडीगावकर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आडवली मालडी विभागातून किमान ७० % मतदान निलेश राणे यांना होण्याचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आडवली मालडी जि. प. विभागातील शिरवंडे गावात ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार मोहीम राबवण्यात आली. आडवली मालडी विभागात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २० ते २५ दिवस नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवली जातं असून गावागावात उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे विभागातून निलेश राणे यांना किमान ७० % मतदान होईल. आणि निलेश राणे किमान ५० ते ६० हजार मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी व्यक्त केला.
शिरवंडे गावातील प्रचारफेरीला माजी सभापती सुनील घाडीगांवकर, युवा नेतृत्व सुशांत घाडीगांवकर यांच्यासह संजय गावकर, सरपंच चैताली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर, माजी सरपंच संतोष लाड, सोनू गावकर, प्रकाश गांवकर, हरेश्वर गावकर, विश्वनाथ गावकर, लक्ष्मण गावकर, लऊराज गावकर, संतोष गावकर, ग्रा. पं. सदस्य कैलास गावकर, विजय खांडेकर, तनुजा गावकर, सुप्रिया बाणे, दिलीप भाट, नारायण गावकर, रवींद्र गावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आडवली मालडी विभागात १९९० पासून आमचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. येथील प्रत्येक वाडी वस्तीवर रस्ते, पाणी, वीज यासारख्या सुविधा पोहोचल्या आहेत. मागील दहा वर्षे आमदार वैभव नाईक यांच्या निष्क्रियतेमुळे विकासासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येताच निलेश राणे यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे. या विभागाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून एकसंघपणे नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे. अनेक ठिकाणी उबाठाचे लोक शिवसेनेत येत असून विभागातील विकासाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी येथील जनता निश्चितपणे निलेश राणे यांच्या धनुष्यबाण निशाणीसमोरील बटण दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास सुनील घाडीगावकर यांनी व्यक्त केला.