रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून श्रीराम मंदिर गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ मंडळ, मालवणला ५० खुर्च्या सुपूर्द


कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे सामाजिक सेवाकार्य
मालवण : शहरातील बसस्थानक नजिक श्रीराम मंदिर गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ मालवण ट्रस्ट ला कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून 50 खुर्च्या भेट स्वरूपात सुपूर्द केल्या.

सामाजिक कार्य, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या भावनेतून खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाकार्य करण्याचा आपला प्रयत्न नेहमीच राहिला असून यापुढेही सुरु राहील, असे दीपक पाटकर यांनी या निमित्ताने सांगितले. यावेळी मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर देऊलकर यांच्या हस्ते दीपक पाटकर व सौ. दिव्या दीपक पाटकर दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रभाकर देऊलकर यांसह सचिव अक्षय सामंत, अशोक ओटवणेकर, खजिनदार महेश परुळेकर, सहसचिव अभिषेक कांदळकर, धनेश हडकर, सदस्य मंजित नार्वेकर, दिनेश किडये यांसह उत्सुक गावकर, बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर, महेश गांवकर, ललित चव्हाण, शुभम लुडबे, अर्जुन चव्हाण, महेश दाभोलकर, माधुरी दाभोलकर, नागेश कांदळकर, मंजित नार्वेकर, प्रकाश कासले, नागेश कांदळकर, रश्मी तुळसकर, सुरेखा हडकर, प्रांजल कवठकर, मधुरा तुळसकर, रविना मोंडकर, अर्चना हडकर, नम्रता कांदळकर, अनिता सुतार, लक्ष्मी वरक, संगीता गावकर, स्मिता इब्रामपुरकर, कविता मोंडकर, बाबू हडकर, रुपेश हडकर, राकेश बगाड, संभाजी नार्वेकर, सचिन नार्वेकर, निखिल आरोंदेकर, अर्चना मिठबावकर, रुचिता हडकर, संदेश चव्हाण, प्रसन्न तुळसकर, निखिल बगाड यांसह नागरिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

