भारत – पाक सामन्याच्या निकालानंतर मालवणात राष्ट्रविरोधी घोषणा

परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून प्रकार ; जाब विचारायला गेलेल्याना अरेरावी : संतप्त जमावाने संबंधिताना पोलिसांच्या केले स्वाधीन

दोघेजण चौकशीसाठी ताब्यात ; सोमवारी सकाळी सकल हिंदू समाज पोलिस ठाण्याला धडक देणार

मालवण | कुणाल मांजरेकर

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विराट विजय मिळवल्यानंतर देशभरात उत्साह निर्माण झाला असताना मालवण शहरात मात्र आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न करताच त्यांना अरेरावी करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी जिहादी प्रवृत्तीच्या या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. 

रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू असताना भारत विजयी झाल्यानंतर आडवण मध्ये काही परप्रांतीय मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मालवणातील हिंदू युवकांनी येथे धडक देत या देशद्रोहीना पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, मालवण मधील सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात काही देशद्रोही मुस्लिमांकडून देशद्रोही कारवाया करत असताना त्याची चौकशी करणे व भंगारवाले, भाजीवाले, बाहेरील आलेले मुस्लिम व्यवसायिक यांची पूर्ण चौकशी करावी व यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी या मागणीसाठी सोमवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता, मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीने मालवण पोलीस ठाण्याला धडक देऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. तरी हिंदू एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मालवण सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4253

Leave a Reply

error: Content is protected !!