धुरीवाडा कासवकर स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन ; आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी
मालवण : शहरातील धुरीवाडा कासवकर स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन जेष्ठ शिवसैनिक सावबा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी या कामासाठी निधी मंजूर करुन देत येथील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला. यासाठी माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, भाई कासवकर यांनी पाठपुरावा केला. या प्रसंगी शहरप्रमुख बाबी जोगी, भूषण कासवकर, पद्माकर पराडकर, राजू सावंत, महेश सावंत, गोविंद खोर्जे, विनायक मंचेकर, साई सुशील तारी, वाघ, दादा जोशी, विलास वेंगुर्लेकर यांच्यासह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते..धुरिवडा ग्रामस्थानी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार मानले.