फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद ; नेटकऱ्यांचा हिरमोड

मुंबई : फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद पडल्याने फेसबुकआणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे.फेसबुकचं तर लॉगिनही होत नाहीय. तर इन्स्टाग्रामही थंड पडलं आहे. पोस्ट, कमेंट करता येणं बंद झालं आहे. तसेच नवीन स्टोरी लोड होणं बंद झालं आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे संबंधित बाधा निर्माण झाली आहे.

दुसरीकडे ट्विटरवर फेसबुक डाऊन आणि इन्स्टाग्राम डाऊन असा टॉपिक ट्रेंडिंगवर आला आहे. विशेष म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने जगभरातील लाखो चाहत्यांचं कोट्यवधींचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. या तांत्रिक बिघाडाबद्दल सध्या कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. चाहते अतिशय आतुरतेने फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरु होण्याची वाट बघत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!