Category बातम्या

जलसंधारणाच्या कामांचा परिणाम आता AI तंत्रज्ञानातून मोजणार

‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार वापर; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सादरीकरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची परिणामकारकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तपासली जाणार आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांसह विविध जलसंधारण प्रकल्पांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुप,…

दामिनी पालव हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग ; चाकू आणि वाहन पोलिसांच्या ताब्यात

संशयित साहिल धुरीच्या माहितीवरून महत्त्वाचे साहित्य जप्त; पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दामिनी किरण पालव हत्या प्रकरणाच्या तपासात कुडाळ पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला चाकू आणि वाहन पोलिसांनी जप्त…

वर्देतील दामिनी पालव कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वनपर भेट

अंत्ययात्रेत सहभागी होत वाहिली श्रद्धांजली; पालव कुटुंबीयांना दिला धीर कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालव कुटुंबीयांवर…

आमदार निलेश राणेंनी भरड आणि बांगीवाड्यातील नवरात्रोत्सव मंडळांना दिल्या सदिच्छा भेटी; देवीचे घेतले दर्शन

मालवण : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळ आणि बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाला सदिच्छा भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार…

मुथूट फिनकॉर्पच्या परवाना निलंबनासाठी नियमानुसार कारवाई करणार

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांना लेखी आश्वासन मालवण नगरपरिषदेने तक्रारीची घेतली गंभीर दखल; चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे संकेत मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची मालवण नगरपरिषदेने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेच्या व्यवसाय…

मालवणच्या श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; भजन, डबलबारी, दशावताराची मेजवानी

२४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; ३० ऑक्टोबरला ढोल-ताशांच्या गजरात श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण सोमवार पेठमधील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत…

दामिनी पालव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही; कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन कुडाळ : वर्दे येथील दामिनी पालव हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून…

सलाम सिंधुदुर्ग पोलिसांना ; दामिनीच्या मारेकऱ्याला अवघ्या पाच तासांत पकडले!

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून संशयित साईल धुरी पाच तासात ताब्यात : सात दिवसांची पोलीस कोठडी वर्दे-कडावल हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावला; सहा पथके मैदानात, सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढला सिंधुदुर्ग | प्रतिनिधी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या…

कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला…

पाणीटंचाईच्या संकटाआधीच मालवण नगरपरिषदेची तयारी

देऊळवाड्यात बंधाऱ्याची उभारणी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त श्रमदान मालवण : पावसातील तुटीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने जलसंधारणाच्या कामाला गती दिली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याच्या उद्देशाने रेवतळे–देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर, देऊळवाडा सागरी महामार्ग…

सॉफ्टलॅबचा दुष्काळावर ‘हायटेक’ वार! पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘Sindhudurg.ai’चे लोकार्पण

AI, ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने पाणीटंचाईवर मात करण्याचा डिजिटल प्लॅन; सिंधुदुर्गात जलव्यवस्थापनाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड मालवण | कुणाल मांजरेकर कोकणात भरपूर पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना का करावा लागतो? जलस्रोतांचे योग्य नियोजन कसे करायचे? वनराई बंधारे बांधल्यानंतर त्यांची देखभाल…

मालवण पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; विकासकामांवरून रणकंदन

विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्याची मागणी; निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर सभेत जोरदार चर्चा मालवण : मालवण नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, बंधाऱ्याच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून देणे, शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि निवासी संकुलांमधील सांडपाण्याच्या प्रश्नांवरून…

error: Content is protected !!