दहशतवादी हल्ल्यातील मृतांना काँग्रेस ओबीसी सेलने वाहिली श्रद्धांजली


मालवण (प्रतिनिधी) काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मालवणात राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल सिंधुदुर्गच्या वतीने भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यां हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, ओबीसी सेल सेक्रेटरी सौ. पल्लवी खानोलकर, जिल्हा सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेस जिल्हा चिटणीस अरविंद मोंडकर, वायरी उपसरपंच सौ. प्राची माणगावकर, सौ. ऐश्वर्या काळसेकर, युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, योगेश कुर्ले, मालवण तालुका काँग्रेसचे पराग माणगावकर, कणकवली काँग्रेस सदस्य व्ही.के. सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी महेश अंधारी म्हणाले, काश्मीर पहलगाम याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर दहशतवाद्यानी अमानुषपणे गोळीबार करत हल्ला केला. त्यात अनेक नागरिकांचे हकनाक बळी गेले. याचा आम्ही कोणताही आक्रोश न करता शांतपणे निषेध करत आहोत. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नसून आम्हा देशवासियांवर आहे. दोन हजार पेक्षा जास्त पर्यटक असलेल्या अशा ठिकाणी एकही शस्त्रधारी सुरक्षा गार्ड नसणे हे सरकारचे अपयश आहे, असेही श्री. अंधारी म्हणाले.

