श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान राणे कुटुंबीयांचे श्रद्धास्थान – ना.नितेश राणे


स्वामी दर्शनानंतर ना.नितेश राणे यांचे भावोद्गार.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान
आम्हा राणे कुटुंबीयांचे मुख्य श्रद्धास्थान असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी
व्यक्त केले. ते आज येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ना.नितेश राणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी ना.राणे बोलत होते. पुढे बोलताना ना.राणे यांनी
श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मला आनंद तर झालेला आहेच, परंतू वयोवृद्ध, ज्येष्ठ, दिव्यांग भाविकांसाठी मंदिरात असलेली स्वतंत्र दर्शन व्यवस्था पाहून मन प्रसन्न झाले असल्याचे सांगून मंदीर समितीचे हे कार्य अत्यंत पुण्याईचे असल्याचे मनोगत व्यक्त करून श्री.स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत मंदीर समितीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांबद्दल जाणून घेवून मंदीर समितीचे उपक्रम गौरवास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार, पो.नि. राजेंद्र टाकणे, गोरक्षक सुधीर बहिरगोंडे, मंदीर समीतीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, मिलन कल्याणशेट्टी, अभिषेक लोकापुरे, कांतु धनशेट्टी, सुनिल कटके, प्रथमेश पवार, राजेंद्र बंदीछोडे, बाबुराव जानकर, अमोल कारंडे, माऊली हळणकर, उमेश पांढरे, महेश कोकरे, सिद्धेश्वर जाधव, नागेश कलशेट्टी, सिद्धेश्वर माळी, प्रथमेश जोजन, योगेश कटारे, राहूल जोजन, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, आदीत्य गवंडी, तुषार मोरे इत्यादी उपस्थित होते.


