रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी आ. निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा


रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावून तसेच विविध सामाजिक उपक्रम रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी उत्साहाने साजरा केला.
रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा सतरा मार्च हा वाढदिवस!. त्यांचे रत्नागिरी येथेही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असून त्यांनीही हा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला. १५ मार्चपासून रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी आ. निलेश राणे यांच्या वाढदिवस शुभेच्छांचे बॅनर झळकू लागले होते. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, जेल रोड, मिरकरवाडा, आठवडा बाजार, आरटीओ ऑफिस नाका, शिवाजी नगर, जलतरण तलाव, जे के फाइल्स या ठिकाणी हे बॅनर झळकले. रविवारी १६ मार्च रोजी पूर्वसंध्येला मालवण येथे आ. निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी रत्नागिरी येथून मोठ्या संखेने कार्यकर्ते मालवण येथे रवाना झाले होते. तेथे आ. निलेश राणे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या. तर वाढदिवसा दिवशी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या माध्यमातून रत्नागिरीतील आविष्कार संस्थेचे सौ.सविता कामत विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी वर्ग तसेच संस्थेच्या माध्यमातून आ.निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.सतेज नलावडे, चिटणीस अशोक वाडेकर,श्री.भाई जठार, श्री.नित्यानंद दळवी, स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शरद पालकर,श्री.अनिल पावसकर, श्री.तुषार देसाई,श्री.संजीव बने,श्री.अशोक पावसकर, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कांबळे,व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर,नितीन चव्हाण,बाबासाहेब कांबळे,विनिता पवार,तीर्था रेवाळे आदी पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

रत्नागिरी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवांची पालखी शिमगोत्सवा निमित्त झाडगाव येथील सानेवर बसली आहे. तेथे मंडळाच्या पदाधिकार्यांनी जावून पालखीचे दर्शन घेऊन आ. निलेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी देवासमोर गाऱ्हाणे घातले आणि प्रार्थना केली. तर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १७ मार्च रोजी सुरु झालेला हा रक्तदानाचा उपक्रम माजी केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसापर्यंत सुरु ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यानी केल आहे. त्यानंतर माहेर या संस्थेतील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. येथील लहानग्यानीही आ. निलेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच गाणी दाखवून या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ही मुले सहभागी झाली. या सर्व उपक्रमांमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, शिवाजी कारेकर, अजय लिंगायत, राहुल भाटकर, अमित देसाई, अमृत गोरे, साई सावंत, ययाती शिवलकर, श्रीनाथ सावंत, निखिल शेट्ये, नितीन पवार, ओंकार आंब्रे, सौ. प्रणाली तोडणकर- धुळप, प्रणव सुर्वे, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, सौ. अश्विनी देसाई, अनघा मगदूम, सतीश लिंगायत, कृष्णा पाटील, सिद्धेश धुळप, विशाल कांबळे, अभी कारेकर, बाबा भोळे, प्रशांत देसाई, राजेश झगडे, दुर्गेश पिलणकर, अंकुर मोहिते, उद्देश लाड, कु. अनन्या मगदूम आदि सहभागी झाले होते.

